शनिवार, ९ जून, २०१२

खरे सदगुरू











जीवनात प्रत्येक जण सुखाची अपेक्षा करत असतो, नव्हे तर प्रत्याकाला सुख हवेच असते, अर्थात प्रत्येकाच्या सुखाच्या व्याख्या वेगवेळ्या असतील, मग सुख म्हणजे नक्की आहे तरी काय ? याचा शोध प्रथम घेतला पाहिजे, खर तर सर्वाना सुखाची गोडीही केव्हा ना केव्हातरी आपापल्या परीने मिळतेच म्हणजे प्रत्येकजण काहीकाळ सुखाचा उपभोग घेतच असतो. सुखाच्या या कल्पना ना काहींनी उन- सावली, तर डोंगर- दरी ची उपमा दिलेली आहे. आगदी बरोबर आहे, कारण  खरोखर सुख तसेच प्रत्येकाच्या आयुष्यात येते व जाते. काही काळ मनुष्य आनंदी तर काही काळ दुखी राहतो. पण प्रत्येकाला दुख हि कल्पनाच नको असते.सदैव सुख मिळावे अशी अपेक्षा असते. सहाजिकच मनुष्य सदैव सुखाची अपेक्षा करत राहीला /राहतो/राहणार. आणि ते मिळविण्यासाठी प्रयत्नही करणार, याचा अर्थ प्रत्येक जन ख-या व सदैव अशा सुखाचा शोध घेतच असतो. या सुखाचा शोध घेताना मनुष्याला समजते प्रत्येक गोष्टीत सुख आहे परंतु त क्षणिक आहे निरंतर नाही. मग निरंतर सुख आहे तरी कोठे, मग एकच मार्ग शिल्लक राहतो तो म्हणजे अध्यात्मिक, एकदा का माणसाला अध्यात्मिक ज्ञान झाले कि  या क्षणिक सुखात न अडकता तो निरंतर सुखाच्या शोधाच्या मार्गाला म्हणजे अध्यात्माकडे वळण्याचा प्रयत्न करतो. पण या समाजात तर आध्यात्मिक ज्ञानाचा तर बाजार मांडलेला आहे. किती आश्रम ? किती बाबा? किती साधू ? किती बुवा ? कोठे जावे कोण करून देईल ख-या अध्यात्माची ओळख? अशा नाना शंका सहजच मनात येवून जातात. कि ज्या बाबाकडे जास्त समाज जात असेल किंवा ज्याचे प्रचार कार्य  जास्त असेल, तेच खरे सदगुरु असतील असे गृहीत धरून मनुष्य बिचारा होवून कधी या बाबाकडे तर कधी दुस-या कडे , कधी या आश्रमाकडे तर कधी दुस-या आश्रमाकडे जात असतो, परंतु एवढे करूनही खरे आध्यात्मिक ज्ञान कोठे प्राप्त होत नाही, मिळते तेक्षणिक समाधानच, मग  काय पूर्वी प्रपंचातल्या उन सावल्या तशा आता सत्संगाच्या नावाने क्षणिक समाधान, अर्थात सत्संगाला विरोध हा हेते येथे नव्हे. पण नक्की सत्संग म्हणजे काय हे न जाणता सत्संगाच्या नावाने भरलेला बाजार याला विरोध किंवा आक्षेप असण्यास हरकत नसावी. समोरील बाबा किंवा संत यांनी  अध्यात्मिक ज्ञान किंवा ते सुख आत्मसात केलेही असेल, पण केवळ त्यांना पाहून किंवा ऐकून त्यांचे विचार किंवा तत्व न समजून घेता, व तसे आचरण न करता मनुष्य कितपत सुखी होत असेल हे फक्त स्वतःलाच ठाऊक. जर कायमस्वरूपी मनुष्य सुखी होत असेल तर तो खरचच खूप भाग्यवान असावा. जर नसेल तर मग मात्र त्या साधुना किंवा त्या संतांनाच दोष लावण्यास मनुष्य मागेपुढे पाहणार नाही. अर्थात हे पण ज्याने त्याने आपलेच ठरवायचे. म्हणजे आपण ज्यांचेकडे गेलो किंवा जात आहोत त्यांच्या मुळे नक्की काय साधले गेले. ते योग्य सदगुरू  होते काय, कि मीच त्या साठी अपात्र  होतो किंवा आहे. खरच खूप मोठा कोड च  असतं कि जीवनात, कसे ओळखावे सदगुरू. पहा कि एक मार्ग सुचावासा वाटतो, जसा एखाद्या गुप्तधनाच्या दिलेल्या नकाशा नुसार काही दिशा निर्देश किंवा ठेवलेली निशाणी बरोबर आहे, असा थोडा जरी प्रत्यय यायला सुरवात झाली. कि समजावे कि आपण योग्य मार्गाने मार्गक्रमण करत आहोत. ख-या सुखाच्या किंवा त्या ज्ञानाकडे जाण्याच्या योग्य मार्गाकडे आमची वाटचाल बरोबर आहे.त्या नुसारच मोर्गोत्क्रमण करणे हिताचे राहील। व तेच  खरे मार्ग्दश्रक किंवा  खरे सदगुरू आहेत याची खात्री बाळगावी. धन्यवाद,रामदास नामदेव ढोरमले       विश्वव्यापी मानवधर्म आश्रम,